अजूनही वेळ गेलेली नाही; मराठा समाजाचा भाजपला इशारा

मुंबई | गुजरातमध्ये सत्ता राखण्यासाठी भाजपला चांगलाच संघर्ष करावा लागला. याचाच दाखला देत महाराष्ट्रातील मराठा समाजाने भाजपला इशारा दिला आहे.

“जर गुजरातमध्ये 12 टक्के पाटीदार भाजपला हादरा देऊ शकतात तर विचार करा 2020 ला महाराष्ट्रात 33 टक्के मराठा समाज काय करु शकतो”, अशी पोस्ट मराठा क्रांती मोर्चाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आली आहे.

गुजरातचे निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. त्यातच महाराष्ट्रात मराठ्यांनी भाजपला इशारा दिलाय. मात्र भाजप हा इशारा गांभीर्याने घेणार की नाही हा प्रश्नच आहे.