ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…

मुंबई | अनेकजण आता वस्तू खरेदी करण्यासोबतच ऑनलाईन खाद्यपदार्थ देखील मागवत असतात. मात्र अशा ग्राहकांसाठी धक्कादायक असा एक व्हीडिओ समोर आला.

ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीचा एक कर्मचारी रस्त्यातच पार्सलमधील काही खाद्यपदार्थ खात असल्याचं या व्हीडिमध्ये दिसत आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. 

पार्सलमधील खाद्द्यावर चोरुन डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्याच्या टी-शर्टवर ‘झोमॅटो’ या कंपनीचं नाव दिसत आहे. हा व्हीडिओ कुठला आहे आणि कुणी काढला ते अद्याप समजू शकलेलं नाही. 

दरम्यान, हा व्हीडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन  

-70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; याचं श्रेय फक्त मोदींना- जितेंद्र आव्हाड

-अखेर विजय मल्ल्याचा खेळ खल्लास; लवकरच मल्ल्याला भारतात आणणार!

-धुळे महापालिकेच्या विजयी उमेदवारांची यादी जाहीर, पाहा कोण कोण जिंकलं…

-अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील नेमका आहे कोण?