नवी दिल्ली | चंद्रावर गोठलेल्या स्थितीतील पाणी आढळल्याच्या माहितीला नासाच्या शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. 10 वर्षांपुर्वी नासाने भारताकडून प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.
नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे. ‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात बर्फ इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात बर्फ आढळल्यानं आता आगामी मोहिमांसाठी तसेच चंद्रावर राहण्याच्या दृष्टीनं मानवाला पाऊल टाकणं शक्य होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?
-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’
-सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….
-मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!
-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताच्या पदरात 8 वे पदक!
Comments are closed.