धक्कादायक!!! देशात आता 3200 कोटींचा टीडीएस घोटाळा

मुंबई | देशातील बँक घोटाळ्यानंतर आता आयकर विभागाने 3200 कोटींचा टीडीएस घोटाळा उघड केला आहे. कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापणाऱ्या मात्र तो सरकारकडे जमाच न करणाऱ्या 447 कंपन्यांचा आयकर विभागाने पर्दाफाश केलाय.

याप्रकरणी अनेक प्रकरणांमध्ये वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या कंपन्या आणि मालकांविरोधात आयटी अॅक्टच्या सेक्शन 276बी अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या कंपन्यांनी कर्मचाऱ्याच्या टीडीएसचा वापर व्यवसायात गुंतवणुकीसाठी केला आहे. आयकर विभागाने वसुलीची कारवाई सुरु केली असून संबंधित कंपन्यांची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.