धक्कादायक!!! पुण्याजवळच्या चाकणमधून संशयित दहशतवादी ताब्यात

पुणे | देशात पाच राज्यांच्या निकालाची धामधूम सुरु असताना पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याजवळच्या चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे युनिटने ही मोठी कारवाई केली आहे. हा खलिस्तान समर्थक दहशतवादी असल्याचा संशय आहे.

संशयित दहशतवाद्याकडून देशी बनावटीची बंदूक आणि 5 राऊंड जप्त करण्यात आले आहेत. त्याच्यावर UAPA कायद्यातंर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने त्याला 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तो स्वतंत्र खलिस्तान निर्मितीसाठी काम करत होता, असं समोर आलंय. 

महत्वाच्या बातम्या –

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा