नाशिककरांना नेमकं काय झालंय? का ठेवतात घराबाहेर लाल पाण्याच्या बाटल्या?

नाशिक | जर तुम्ही नाशिकमध्ये फिरत असाल तर नाशिककरांना काय झालंय?, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कारण नाशिकमध्ये अनेक घरांबाहेर तुम्हाला लाल पाणी भरुन ठेवलेल्या बाटल्या दिसतील.

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी लोक अशा प्रकारच्या बाटल्या घराबाहेर ठेवत आहे. कुत्री अशा लाल बाटल्यांना घाबरतात, अशी नागरिकांची धारणा आहे. सिडको भागातील घरांबाहेर अशा बाटल्या सध्या पहायला मिळत आहेत.

दरम्यान, कुत्री लाल रंगाचं पाणी भरुन ठेवलेल्या बाटल्यांना का घाबरतात? याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाहीये. मात्र अशा बाटल्या घराबाहेर ठेवणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात नाशिक लाल रंगाचं दिसलं तर नवल वाटायला नको.