…नाहीतर भाजपमध्ये फक्त संघवालेच राहतील- अजित पवार

नागपूर | भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते नाराज होऊन पक्ष सोडून चालले आहेत. लवकर काहीतरी निर्णय घ्या, नाहीतर भाजपमध्ये फक्त जुने संघवालेच राहतील, असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला. ते विधानसभेत बोलत होते. 

शेतकरी कर्जमाफीवरुन अजित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच हमीभावाचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. 

दरम्यान, सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आम्हाला जसं लोकांनी घरी पाठवलं तसं तुम्हालाही पाठवतील, असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.