नोटाबंदीच्या समर्थनासाठी मोदींनी शेअर केला व्हिडिओ, मंत्र्यांची फौजही मैदानात!

नवी दिल्ली | नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात काळा दिवस साजरा केला जात असताना भाजपकडून मात्र नोटाबंदीचं जोरदार समर्थन सुरु आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे फायदे सांगणारा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केलाय. 

नोटाबंदीमुळे फायदा व्हायचं दूरच मात्र सर्वसामान्यांचे हाल झाले त्यामुळे विरोधकांकडून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातोय. तर नोटाबंदीमुळे देशाला मोठे फायदे झाल्याचा दावा करत भाजपकडून हा दिवस काळा पैसा विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातोय. 

दरम्यान, या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी पंतप्रधानांसह सर्वच मंत्र्यांना मैदानात उतरावं लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

पाहा व्हिडिओ-