पंकजा समर्थकांचा विरोध, दंगलविरोधी पथकाच्या बंदोबस्तात नामदेव शास्त्रींचं कीर्तन

औरंगाबाद | भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाला पोलीस सुरक्षा देण्याची वेळ आली. भालगावमध्ये हा प्रकार घडला. 

भालगावमधील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नामदेव शास्त्रींच्या काल्याच्या कीर्तनाने होणार होती. मात्र गावातील पंकजा मुंडे समर्थकांनी त्यांच्या कीर्तनाला विरोध केला होता. 

पंकजा समर्थकांनी पोलिसांना निवेदन देऊन कीर्तनाला परवानगी नाकारण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी ही मागणी धुडकावून लावली. 

दरम्यान, नामदेव शास्त्री गावात येताच पंकजा समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत विरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर बंदोबस्तात काल्याचं कीर्तन पार पडलं.