बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…

मुंबई | एकनाथ शिंदे गट कोणत्या पक्षात विलीन होणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. शिंदे गटाला प्रहार, भाजप आणि मनसे असे तीन पर्याय आहेत. त्यात त्यांची हिंदुत्वासाठी भाजपसोबत जाण्याची तीव्र शक्यता वर्तविली जाते. गेले काही दिवस भाजप आणि शिंदे गटाच्या यासंबंधी छुप्या चर्चा देखील सुरु आहेत. भाजप मात्र अधिकृतपणे याला नकार देते आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर भाष्य केले आहे. बंडखोर आमदारांकडे विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही आणि भाजपने ही जबाबदारी झटकल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. गेले दोन दिवस गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपने या बंडखोर आमदारांना पक्षात विलीन करुन घेण्यास नकार दिला आहे, असे चव्हाण म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले 55 आमदार आहेत. जोपर्यंत फू़ट मान्य होत नाही, तिला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हा 55 लोकांचा गट आहे. त्यातील काही लोकांनी विरोधी मते दिली तर त्यांची आमदारकी जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा जर खरा असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट मोठ्या संकटात सापडणार आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 जूनला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागेल.

थोडक्यात बातम्या – 

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?

‘डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, याचा काय अर्थ?’; एकनाथ शिंदेंचा घणाघात

मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी

‘मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही’, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More