मतदारांना पैशाचं प्रलोभन दाखवल्यास उमेदवारावर 5 वर्षाची बंदी?

नवी दिल्ली | मतदारांना पैशाचं प्रलोभन दाखवणाऱ्या उमेदवारांवर 5 वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लवकरच यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजतंय. 
निवडणुकांमध्ये पैशाची वारेमाप उधळण केली जाते. पैशाच्या आधारावर मतं विकत घेतली जातात. मात्र याला वेसन घालण्यासाठी निवडणूक आयोगाने या उपायावर विचार सुरु केला आहे. पैशाचं वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास ही कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यास हा निर्णय प्रत्यक्षात येईल.
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या