महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता?; संतप्त उदयनराजेंना अश्रू अनावर

मुंबई | खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन त्यांचा समाचार घेतला. तसेच महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही, महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता, असा सवालही त्यांनी राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना विचारला. 

छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) विकृत लिखाण केलं जातं, भाषणातून त्यांची अवहेलना केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही?, असा सवालही त्यांनी केलाय.

शिवाजी महाराज यांच्याबाबतचं हे विकृतीकरण थांबवलं नाही तर पुढच्या पिढीसमोर सोयीने मांडलेला मोडलेले तोडलेला इतिहास जाईल. त्यांना काय खरा इतिहास समजणार. त्यांना वाटेल हाच खरा इतिहास आहे. ही एकटी माझी जबाबदारी नाही. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलंय.

शिवाजी महाराजांची लिखाण आणि भाषणातून अवहेलना केली जाते. तेव्हा राग कसा येत नाही? नाव त्यांचं घ्यायचं विचार सांगता मग तुम्हाला राग कसा येत नाही?, असं ते म्हणालेत.

वेगवेगळे पक्ष असले तरी तुमचा अजेंडा वेगळा असू शकतो. महाराजांचं नाव घेता तेव्हा तुमचा मूळ अजेंडा शिवाजी महाराजांचे विचारच आहे. नसेल तर महाराजांचं नाव का घ्यायचं?, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-