महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? फडणवीस की येडीयुरप्पा???”, पाहा कुणी विचारलं…

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मात्र त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत… फडणवीस की येडीयुरप्पा?? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

महत्त्वाचे केंद्रीय मंत्री नैसर्गिक आपत्तीची पाहणी करताना त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य एकही मंत्री नसावा, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे, असं ते म्हणाले.

पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारतर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्याप राज्याला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेटयामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा केला, असंही थोरात म्हणाले.

दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारने पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून ही स्थिती अधिक बिकट झाली आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पूरग्रस्तांच्या मदतीला उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत!

-पूरग्रस्तांच्या मदतीला क्रिकेटचा ‘देव’ धावला! इतरांनाही मदत करण्याचं आवाहन

-“तो पराभव मी कधीही विसरू शकत नाही”

-चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास!

-काश्मिरच्या लाल चौकात अमित शहा फडकवणार तिरंगा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या