महिलांनी काही घातलं नाही तरी त्या छान दिसतात- रामदेव बाबा
मुंबई | योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात. माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात, असं रामदेव बाबांनी म्हटलंय.
रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत, असंही ते यावेळी म्हणालेत.
मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा, असं रामदेव बाबा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘दृश्यम 2’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 6 दिवसात कमावले ‘इतके’ कोटी
- अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर
- नवख्या शेतकरीपुत्रानं राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याला चारली पराभवाची धूळ
- “मातोश्रीचं कीचन माझ्या हातात असं…” आशा मामिडींचा मोठा गौप्यस्फोट
- टाटांची मोठी डील, ही बडी कंपनी लवकरच घेणार ताब्यात!
Comments are closed.