मुंबईकरांच्या खिशाला कात्री, बेस्टच्या भाड्यात वाढ होणार

मुंबई | मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टच्या तिकीटात दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेस्ट समितीमध्ये यासंदर्भातील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. 

पहिल्या 4 किलोमीटरसाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. 4 किलोमीटरनंतर 1 रुपयांपासून ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ सुचवण्यात आलीय. 

बस पासच्या किंमतीतही 40 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत तर शालेय विद्यार्थ्यांच्या पासमध्ये 50 ते 100 रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तोट्यात चाललेल्या बसला सुस्थितीत आणण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार आहे.