मूल दत्तक घेण्याच्या नियमात बदल, आता एकाच मुलाचा पर्याय

मुंबई | मूल दत्तक घेण्याच्या नियमामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला आहे. यापुढे मूल दत्तक घेताना पालकांना मूल निवडण्याचा हक्क नसणार आहे. मात्र राष्ट्रीय दत्तक मंडळाकडून देण्यात आलेलं मूल स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार पालकांना असणार आहे.

मूल दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्या पालकांना सरकारच्या केअरिंग्ज या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. पूर्वी पालकांना 3 मुलांपैकी 1 मूल निवडण्याचा अधिकार होता. मात्र आजपासून ही पद्धत बंद करण्यात आली असून पालकांपुढे केवळ एकाच मुलाचा पर्याय असणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या