युवराजच्या 6 षटकारांची पुनरावृत्ती; रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम!

राजकोट | भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एका षटकांत 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनगर आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यात त्याने हा पराक्रम केला. 

15 व्या षटकांत त्याने 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले.  इतकंच नव्हे तर त्याने 69 चेंडूत 154 धावा देखील केल्या. आपल्या संपूर्ण खेळीत त्याने 10 षटकार आणि 15 चौकार ठोकले

दरम्यान, अमरेली संघासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान होते. त्यांचा डाव 118 धावांवरच डाव आटोपला.