राजस्थानमध्ये भाजपला मोठा झटका; काँग्रेसची सत्ता येणार!

नवी दिल्ली | आगामी विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार करुन काँग्रेस सत्तेवर विराजमान होईल, असं टाईम्स नाऊच्या सर्व्हेत म्हटलं आहे. 

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत. गेल्यावेळी भाजपने 163 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी भाजपला आपल्या 75 जागा गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र मोठी वाढ होणार आहे. गेल्यावेळी फक्त 21 जागा मिळालेल्या काँग्रेसला यावेळी 115 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

200 विधानसभा मतदारसंघांतील 22 हजार 345 लोकांशी संवाद साधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

कोणत्या राज्यात काय होणार?-

-राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कुणाची सत्ता?

-शिवराज सिंग पास होणार; मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुलणार!

-मध्य प्रदेशप्रमाणे छत्तीसगडमध्येही भाजप सत्ता राखणार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या