रैना तुझ्या ‘वायफाय’चा पासवर्ड सांग, मयंतीच्या ट्विटनं चाहते क्रेझी!

कानपूर | भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि निवेदिक मयंती लँगर एका ट्विटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आलीय. क्रिकेटपटू सुरेश रैनाला उद्देशून तिनं हे ट्विट केलं होतं. 

भारताने कानपूरचा सामना जिंकून मालिका खिशात घातल्यानंतर मयंतीने हे ट्विट केलं होतं. ज्यामध्ये तिला सुरेश रैना नावाचं वायफाय सापडल्याचा स्क्रीन शॉट होता. या ट्विटमध्ये तिने सुरेश रैनाला वायफायचा विचारला. 

दरम्यान, सुरेश रैनानं अद्याप या ट्विटला उत्तर दिलं नाही, मात्र नेटकऱ्यांनी या ट्विटर अशा प्रतिक्रिया दिल्या आहे ज्यामुळे हे ट्विट चांगलंच प्रसिद्धीत आलंय.