रोहितच्या खेळीचं सेलिब्रेशन; रहाणे-चहलचा मस्तीखोरपणा!

मोहाली | श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने दुहेरी शतक ठोकलं. त्याच्या या खेळीचं टीम इंडियाने सेलिब्रेशन नसतं केलं तरच नवल.

रोहितच्या दुहेरी शतकाचं केक कापून टीम इंडियानं सेलिब्रेशन केलं. यावेळी रोहित शर्माच्या गालांचा केक चोळण्याचा मोह मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि यजुर्वेंद्र चहलला आवरता आला नाही.

दरम्यान, रोहित शर्माच्या लग्नाचाही आज पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि त्याची बायको रितिकासाठी हा दिवस आनंदाचा ठरला.

पाहा व्हिडिओ-