लोकशाही धोक्यात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या दाव्यानं खळबळ

नवी दिल्ली | देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडालीय.

न्यायमूर्ती जे चेल्मेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली. गेल्या 2 महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अनियमितता आहे, सरन्यायाधीशांकडे तक्रार करुनही काहीच उपयोग झाला नाही, असा त्यांचा आरोप आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे ज्या 4 न्यायाधीशांनी हे आरोप केले आहेत, ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे गांभीर्याने पाहिलं जातंय. या चौघांना डावलून महत्त्वाचे खटले कनिष्ठ न्यायाधीशांकडे दिले जात असल्याची देखील चर्चा आहे. 

Google+ Linkedin