शिंदे सरकार कधी कोसळणार?, शरद पवार म्हणाले…
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिर्डी दौऱ्यावर गेले आहेत. या वेळेस त्यांनी सिन्नर येथे एका मंदीरात भेट दिली. यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. या मागचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मंदीरात जाऊन आपला हात तिथल्या ज्योतिषाला दाखवल्याची माहिती समोर आलीये. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात सुरूवात केलीये.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीये. पत्रकार परिषेद सुरु असताना दोन महिन्यात राज्य सरकार कोसळणार असल्याचं भाकित केलं जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं.
मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही, असं म्हणत शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यामंत्र्यांनी आपला हात ज्योतिषाला दाखवून सरकार किती काळ टिकणार याची माहिती घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीये.
थोडक्यात बातम्या-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले होते?; राज्यात चर्चांना उधाण
सर्वसामान्यांना शॉक; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Comments are closed.