शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा उपचार घेणार नाही!

अहमदनगर | ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा यापुढे कुठलेही उपचार घेणार नाही, असा इशारा उद्धव मापारी यांनी दिलाय. पोलिसांच्या गोळीबारात उद्धव मापारी यांच्या छातीला गोळी लागलीय. 

अहमदनगरमध्ये ऊसदारासाठीचं आंदोलन चिघळलं होतं. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात उद्धव मापारी यांच्यासह बाबूराव तुकळे जखमी झालेत. त्यांना शासनाने प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही केलीय. 

दरम्यान, दवाखान्यात उपचार सुरु असतानाही आपल्या सहकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या शेतकऱ्याने केलीय. अन्यथा उपचार न घेण्याचा इशाराही सरकारला दिलाय.