बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग दुसऱ्या दिवशी ‘सामना’तून तोफ धडाडली, पाहा कुणाकुणाला दिलाय इशारा!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्पष्टोक्तेपणाबद्दल सर्वच स्तरात चर्चा सुरु आहे. त्यात त्यांनी सर्व आमदारांना भावनिक आवाहन करत, समोर येऊन बोलण्यास सांगितले. तसेच आपण मुख्यमंत्रिपद आणि पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष, सर्व बंडखोर आमदार आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांना स्पष्ट शब्दात खडसावलं आहे. शिवसेना संकटांना सामोरा जाणारा पक्ष आहे. शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनाला आणि दबावाला बळी पडणाऱ्या आमदारांना, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसैनिकांनी ठरवलं तर हे सर्व आमदार कायमचे माजी आमदार होऊ शकतात. आज जे भाजपवाले त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आहेत, तेच गरज संपताच त्यांना पुन्हा कचऱ्यात फेकून देतील. भाजपची तीच परंपरा आहे. बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, अशा शब्दात बंडखोर आमदारांची कानउघाडणी करण्यात आली आहे.

अग्रलेखात एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजप असल्याचे म्हटले आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात भाजपचा काही संबंध नाही. अशी मखलाशी भाजपने करु नये, सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे आमदार होते, तेथे महाराष्ट्रातील भाजप नेते उपस्थित होते. पुन्हा हे लोक गुवाहाटीला गेले, तेव्हा विमानतळावर भाजपचे आसामचे मंत्री उपस्थित होते. हॉटेल्स, विमान, गाड्या, विशेष सुरक्षा ही सर्व भाजपची कृपा नाहीतर काय?, असा प्रश्न देखील सामनाच्या अग्रलेखातून विचारला गेला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”

“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल माझ्या मनात आणखी आदर वाढला”

“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More