अहमदाबाद | काँग्रेसनं मला राजकारणात येण्याचं निमंत्रण दिलंय. मी राजकारणात येणार नाही, मात्र भाजपच्या पराभवासाठी नक्की काम करेन, असं पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं म्हटलंय.
हार्दिकचे सहकारी वरुण आणि रेश्मा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यापार्श्वभूमीवर हार्दिकनं तिखट प्रतिक्रिया दिली तसेच भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
वरुण आणि रेश्मा काही दिवसांपूर्वी भाजपला शिव्या देत होते. आज तेच त्यांच्या कळपात सहभागी झालेत. दोघेही गद्दार आहे, असं तो म्हणाला.
Comments are closed.