Top News मनोरंजन

सुशांत आत्महत्याप्रकरणी नोकर दिपेश सावंतला अटक

मुंबई | सुशांत आत्महत्या प्रकरणात काल एक मोठी घडामोड झाली. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा याला अटक करण्यात आली. तर आता एनसीबीने अजून एका व्यक्तीला अटक केली आहे.

तपासातून उघड झालेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातून शनिवारी रात्री सुशांतचा नोकर दिपेश सावंतला अटक करण्यात आली. दिपेशची चौकशी केल्यानंतर त्याला ड्रग बाळगणं आणि ते सुशांतला पुरवण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच रविवारी त्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

सुशांतचे ड्रग कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर याचा तिसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याचं समोर आलं. रियाच्या भाऊ शौविक चक्रवर्ती याला अटक केल्यानंतर रियाला देखील लवकरच अटक होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनुसार हा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही”

भारतीय जवानांकडून माणुसकीचं दर्शन; सीमेवर रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांचे वाचवले प्राण

“इतर देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य, मग भारत का अयशस्वी?”

पांडुरंग रायकरांच्या मृत्यूप्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल- अजित पवार

सरकारी कामासाठी ईईएसएलने टाटा मोटर्स आणि ह्युंदाईच्या ‘या’ दोन इलेक्ट्रिक गाड्यांची केली खरेदी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या