सोलापूरच्या दुधनी स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरुन अपघात

सोलापूर | सोलापूरच्या दूधनी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं अपघात झालाय. रुळाला तडा गेल्याने मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी रेल्वेरुळाला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून मालगडीचे घसरलेले 5 डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून जवळपास सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या