महाराष्ट्र मुंबई

हिंदुस्थानी भाऊला आयएसआय या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी!

 मुंबई | बिग बाॅस या कार्यक्रमातून सर्वांना परिचित झालेलं नाव म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. आपल्या हटक्या वक्तव्यानं हा भाऊ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. आयएसआय या दहशतवादी संघटनेकडून आता आपल्याला धमक्या आल्याचा हिंदुस्थानी भाऊने दावा केला आहे.

ट्विटरवर ट्विट करत हिंदुस्थानी भाऊ म्हणाला, “आयएसायच्या लेफ्टनंट कर्नलनं मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमचे लोक तुझ्या शहरात पोहचले आहेत” असं म्हणत त्याने याबाबत माहिती दिली आहे.

यासोबत धमकी आलेल्या मोबाईल फोनचे नंबरही त्यानं ट्विट मध्ये समाविष्ट केले आहेत. आपल्याकडे या सर्व काॅलचे रेकाॅर्डिंग आहे असंही त्यानं सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनाही या ट्विटमध्ये त्यानं टॅग केलं आहे.

 

दरम्यान, हिंदुस्थानी भाऊनं एकता कपूर व तीच्या आईविरोधात एका वेब सिरीजच्या आक्षेपार्ह दृश्यांवर आक्षेप घेत गुन्हा दाखल केला होता. आपल्या टिकाटिपण्णी व वादग्रस्त वक्तव्यानं तो नेहमीच चर्चेत असल्याचं पहायला मिळालं आहे.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या