मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा पुन्हा झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावला आहे.

नवाब मलिक यांच्यावतीने आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती.

याआधीही मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्यावर प्रकृती अस्वस्थामुळे कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुंबईतल्या कुर्ला इथल्या जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. याआधी त्यांच्या जामीन अर्जावर  24 नोव्हेंबरला निकाल अपेक्षित होता, पण निकालाचं कामकाज पूर्ण न झाल्याने आज निकाल देण्यात आला.

मंत्री नवाब मलिक यांनी जी जमीन घेतली आहे. ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा राईट हँड आहे. आणि ज्याला हसीना पारकर (Haseena Parkar) दाऊदच्या प्रॉपर्टी  बिझमेसमध्ये फ्रंट मॅन वापरत होती. त्यांच्याकडून ही जमीन त्यांनी घेतली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-