‘वेळ पडली तर…’, अजित पवारांनी गौतमीला सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) नृत्यात अश्लीलता आहे, असं म्हणत अनेकांनी तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही(Ajit Pawar) गौतमी पाटीलचं नाव न घेता तिला सुनावलं आहे.

बुधवारी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रात लावणीची परंपरा आहे. महाराष्ट्रातील लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे असले पाहीजेत. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको.

दुर्दैवाने काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते सुरू आहेत. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे, असंही पवार म्हणाले. तसेच वेळ पडल्यावर हा विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बऱ्याचदा अशा कार्यक्रमांमध्ये पाठीमागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा(NCP) बोर्ड लावला जातो. हे आम्हाला मान्य नाही. असले कार्यक्रम राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी करू नये. तशा सूचना राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांना देणार आहोत, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, पवारांच्या बोलण्यात गौतमी पाटीलचं नाव नसलं तरी त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी गौतमीलाच सुनावलं आहे, असं स्पष्ट दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या-