Top News महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर

मुंबई | ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केला गेल्याची माहिती समजत आहे. जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावलीमध्ये हा सर्व प्रकार चालू होता. एका घरात तांदळात एकनाथ शिंदेंचा फोटो ठेवत अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांच्या जिवाल धोका किंवा त्यांना शरीराला जीवघेण्या जखमा होण्यासाठी या अघोरी प्रथेचा वापर केला गेला आहे.

शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आहे. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. पोलीस आता यामागचा खरा सुत्रधार कोण याचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवारॉ

लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”

छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या