बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; ‘या’ तारखेपासून होणार पगारवाढ?

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. सध्या लाखो कर्मचारी सातवा वेतन आयोग लागू होण्याची वाट बघत आहेत. त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून देशात नवीन वेतन नियम लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होणार आहे. कर्मचाऱ्यांना मूळ पगार हा एकूण वार्षिक वेतनाच्या 50 टक्के असेल. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतील योगदानातही सुधारणा होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2014 मध्ये मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप त्या लागू करण्यात आलेल्या नाहीत. सरकार लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील 1 कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये 50 लाख केंद्र सरकारी तर 58 लाख निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे.

आयोगाच्या शिफारशीनुसार, प्राथमिक स्तरावरील कर्मचाऱ्याचा किमान पगार 7 हजार वरुन 18 हजार करण्यात आला आहे. क्लास 1 अधिकाऱ्याचा किमान पगार 56 हजार 100 रुपये निश्चित करण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगाने पगार, भत्ते आणि निवृत्तीवेतन यामध्ये सुमारे 23.55 टक्के वाढीची शिफारस केली होती.

दरम्यान, सातव्या वेतन आयोगाने नवीन ‘पे-मॅट्रिक्स’ची घोषणा केली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीच्या सुरुवातीपासून ते निवृत्त होईपर्यंत मिळणाऱ्या पगारवाढीचा अंदाज येणार आहे. प्रशासकीय कर्मचारी, सैन्य दले, लष्करी नर्सिंग सेवा यासाठी वेगवेगळे ‘पे-मॅट्रिक्स’ तयार करण्यात आले आहेत. याआधारावर कर्मचाऱ्यांच्या पगागरात वाढ होईल.

थोडक्यात बातम्या – 

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई

शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली, महाविकास आघाडीतील ‘या’ बड्या नेत्यानं पुन्हा दिला इशारा

ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत; तर प्रशांत किशोर सोशल मीडियात ट्रेंडमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More