बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सत्ता असताना गोट्या खेळत होता का?- इम्तियाज जलील

औरंगाबाद | पाणी हा गंभीर प्रश्न आहे. मग गेले पाच वर्ष राज्यात तुमचीच सत्ता होती की…. तेव्हा काय तुम्ही गोट्या खेळत होता का?, अशी बोचरी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.

आम्ही एवढे मूर्ख नाही. जनताही मूर्ख नाही. विरोधी पक्षात असूनही मी हे प्रश्न विचारत आहे. सत्ता असताना काही केलं नाही. आता सत्ता गेल्यावर हे नाटक आणि नौटंकी कशासाठी हा प्रश्न तुमचे समर्थकही विचारतील, असंही जलील यांनी म्हटलं आहे.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी पंकजा मुंडेंनी औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यावेळी या उपोषणाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, मला कुणावरही टीका करायची नाही की दुषणं द्यायची नाहीत. सरकार अजून नवं आहे. त्यांना सत्तेवर येऊन शंभर दिवस झाले आहेत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

विराट कोहलीचा जबरदस्त स्टंट; व्हिडीओ व्हायरल!

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंची कोलांटीउडी…. आता म्हणतात ‘माझा CAA ला पाठिंबा नाही’!

लोकांच्या अडीअडचणी आता गावातच सुटणार; बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम

कुणाचीही चौकशी करा, आम्ही नाही घाबरत जा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More