मुंबई | मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना लॉकडाउनला कडाडून विरोध केला. अनेक जण वांद्रे स्थानकाबाहेर आपल्याला गावी जाण्याची मागणी करताना दिसत होते. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
वांद्रे हे रेल्वे स्थानक मुख्यमंत्र्याचे निवस्थान मातोश्री पासून 5 मिनिटांवर आहे. ही परिस्थिती जर मुख्यमंत्र्याच्या घराजवळ होऊ शकते, तर मुंबईत आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत?, हे लक्षात येईल. राज्याला इतिहासातला सर्वात कमकुवत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असल्याचे निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला होता. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हटून बसले होते. यावेळी हजारो लोकांनी जमून गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी केली.
वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्याची गाड़ी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून यातील अनेकजण उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते. अथक प्रयत्नांनी काही वेळानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार करत हा जमाव पांगवला.
आता मुंबईची सटकली pic.twitter.com/l7Crlvu2Hf
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
वांद्र्याच्या जमाव प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अमित शहांचा फोन; म्हणाले…
बाबासाहेबांना वंदन करताना खास करुन भीमसैनिकांना धन्यवाद- उद्वव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी हजारोंची गर्दी
तळारांमांसाठी काहीही! दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक
“वॉचमनला जेवण किंवा मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी फुकटच्या सूचना करू नये”
Comments are closed.