बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पॉर्न प्रकरणात मोठी बातमी! राज कुंद्राने क्राईम ब्रांचला दिली इतक्या लाखांची लाच???

मुंबई |  प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड केल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अशातच या प्रतकरणाबाबतीत मोठी माहिती समजली आहे.

राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला 25 लाख रुपयांची लाच दिली असल्याचा दावा या प्रकरणातील आरोपीने केला आहे. त्यासोबतच या प्रकरणात अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूरसुद्धा आरोपी आहे. त्याने ईमेलच्या मदतीने मार्च महिन्यात एसीबीला याबाबतची तक्रार केली होती.

त्यानंतर एप्रिल महिन्यात एसीबीनं ही तक्रार मुंबई पोलीस कमिश्नरच्या ऑफिसमध्ये पाठवली होती. दरम्यान शहरातील पोलीस अधिकारी यावर काहीच भाष्य करायला तयार नाहीत. बुधवारी क्राइम ब्रांन्चनं राज कुंद्राच्या अंधेरीतील ऑफिसमध्येही छापा टाकला होता.

दरम्यान, राज आणि त्याचा बिझनेस पार्टनर उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान क्राईम ब्रांचनं उमेशच्या ऑफिसवर छापा मारला होता. या छाप्यात पोलिसांना 70 अश्लील व्हिडीओ मिळाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात, चार मित्रांचा मृत्यू

‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्याबरोबरीचा’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मनसेच्या दहीहंडीला 100 टक्के नाचायला येणार – प्रविण तरड

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत”

राज्यांना ‘इतक्या’ कोटी लसींचे डोस दिले; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More