Top News महाराष्ट्र मुंबई

‘कोरोना गो’ म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

मुंबई | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात येणार आहे.

संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन रामदास आठवलेंनी केल्याची माहिती समजत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळी रामदास आठवलेंनी आपली कोरोना चाचणी केली होता. तेव्हा त्यानंतर अहवालात ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. काल अभिनेत्री पायल घोषने आरपीआयमध्ये पायल घोषने प्रवेश केला आहे. यावेळी रामदास आठवले अनेकांच्या संपर्कात आले. पायल घोष देखील आता क्वारंटाईन आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्णालयात तटकरे उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षण सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली

गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप

FAU-G गेमचा टीझर लाँच, नोव्हेंबरमध्ये येणार भारतीयांच्या भेटील

“स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाची व्याख्याच बदलली”

“मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून फिरतो, मी थकलो आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या