Top News पुणे महाराष्ट्र

पुणे तिथे काय उणे! मुंबईकरांना मागे टाकत पुणेकर ‘या’ मध्येही अव्वल

पुणे |  ‘पुणे तिथे काय उणे’ याची प्रचिती पुन्हा एकदा आली. पुणेकरांनी मुंबईकरांना विदेशी मद्य रिचवण्यात मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. कोरोनाचा काळ त्यात लॉकडाऊन असताना देखील पुणेकरांचा मद्य रिचवण्यात आघाडी आहे.

फक्त विदेशी मद्यच नाही तर बिअर आणि वाईन पिण्यातही पुणेकारांनी मुंबईसह सर्वांना मागे टाकलं असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळ या उद्योगाला मोठं नुकसान झालं. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच, नोव्हेंबरपर्यंत १८५.२४ लाख लिटर विदेशी मद्य रिचवली गेली.

दरम्यान, या विक्रीचा चांगलाच फायदा राज्य सरकारला झाला असून, राज्याला मद्य विक्रीतून तब्बल ७ हजार ७७६.६६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राईज विझीट!

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे पण हीच शिवसेना…”

एमआयएमचा डोळा असलेली ‘ही’ महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

पोलिसांचा कॅफेवर छापा; तपासादरम्यान समोर आला धक्कादायक प्रकार

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या