Top News महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! महाराष्ट्रात उद्यापासून ‘इतके’ दिवस राहणार रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई | ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. यासाठी खबरदारी म्हणून राज्यात संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या विषाणुची घातकता काही दिवसात समजेल मात्र तोपर्यंत खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.

रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी असणार आहे. 22 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. युरोपातून आणि मध्य पूर्वतून येणा-या प्रवाशांना 14 दिवस सक्तीचे संस्थात्मक क्वांटाईन बंधनकारक करण्यात आलं आहे.

या प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी झाला की त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, यंदाच्या 31 डिसेंबरला आपल्या घरीच रहाव लागणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी रात्रीच्यावेळी घरातच बसावं. अन्यथा पोलीस कारवाई होऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

‘असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं’; राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील

युकेमधून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये नवा कोरोनाचा विषाणू; पण भारत सरकार म्हटतंय ‘नो टेन्शन’!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या