बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही बडे राजकीय नेते, अभिनेते यांनीही कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच यूट्यूबर भुवन बाम याच्या आई आणि वडिलांचं कोरोनानं निधन झाल्याचं समजत आहे. याबाबत भुवनने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

भुवनला नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्याने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. मात्र त्याच्या आई-वडिलांची अगोदच काही वर्षांपासून तब्येत खराब होती. त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून सोशल माध्यमांपासून दूर होता. मात्र आता तेच जगात न राहिल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. भुवनने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

मी माझ्या दोन्ही लाइफलाइन कोरोनामुळे गमावल्या आहेत. आई आणि वडिलांच्या नसण्यानं आता आयुष्यात काहीच पूर्वीसारखं नसेल. एका महिन्यात सर्व काही उध्वस्त झालं आहे. घर, स्वप्न सर्व उध्वस्त झालं. आई, बाबा आता माझ्यासोबत नाहीत. आता शून्यातून जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण मन तयार होत नाही, अशी भावनिक पोस्ट भुवनने केली आहे.

दरम्यान, मी त्यांना वाचविण्यात अपयशी ठरलो का?, मी एक उत्तम मुलगा ठरलो का?, असे प्रश्न आता आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. ते पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकतील का? मी आशा करतो की ते दिवस लवकरच येतील, असंही भुवनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर 95 टक्क्यांवर

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

दुर्दैवी घटना! परीक्षेत पास होऊनही पूजाचं न्यायाधिशाच्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न राहिलं अधुरं, काळाने केला घात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ट्विटरस्पेसच्या माध्यमातून करणार मुक्त गप्पा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More