Top News महाराष्ट्र सोलापूर

तरीही सर्वांना पुरून उरले, तो वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच तर ती 23व्या वर्षी उपसरंच बनली!

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटगे गावचा सर्वात तरूण सरपंच झालेल्या 21 वर्षाच्या ऋतुराज देशमुख यांच्या पॅनलमधील सदस्यांना रात्री फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र ऋतुराज देशमुख यांच्या सदस्यांनी त्यांना खंबीरपणे आपला पाठींबा दिला आणि गावात फुटाफुटीचं राजकारण होऊ दिलं नाही. ऋतुराज देशमुख यांनी थोडक्यातशी बोलताना याबाबत माहिती दिली.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या प्रस्थापितांना पराभवाची धूळ चारत ऋतुराज देशमुख यांनी गावच्या निवडणुकीत स्वतःचे पॅनल निवडून आणलं. निवडणुक झाल्यावर विरोधकांनी देशमुख यांच्या पॅनलमधील सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला. रात्री तीन वाजेपर्यंत सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला असून विरोधक उमेदवारांच्या हातापाया पडले असल्याचं ऋतुराज देशमुख यांनी सांगितलं.

माझ्या उमेदवारांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, या पोराला पाडण्यासाठी आख्खा तालुका झटला, गाव झटला, मात्र आम्ही इरशीने निवडणुक लढलो आहोत. त्यामुळे आम्ही फुटणाऱ्यातले नसून आमचा ऋतुराज देशमुख यांना सरपंचपदासाठी पाठिंबा आहे. माझे पाच उमेदवार होते त्यातील एकही उमेदवार फुटला नसून त्यांनी मला मत दिलीत त्यामुळे मी सरपंच झालो असल्याचं देशमुख म्हणाले. त्यासोबतच घाटगे गावच्या उपसरपंचपदी 23 वर्षाची राजश्री शाहजी कोळेकर यांची निवड झाली आहे. ऋतुराज आणि राजश्री यांच्या निवडीमुळे घाटगे गावची सत्ता तरुणाईच्या हातात गेली आहे.

दरम्यान, मला या निवडणुकीत पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण मला पंचायत समिती मोहोळ सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी वेळोवेळी मदत केली असल्याचं ऋतुराज देशमुख यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

…अन् पुन्हा एकदा भर कार्यक्रमात नेहा कक्करला कोसळलं रडू, सारेच झाले स्तब्ध!

सोन्याच्या दरात वाढ, चांदीला झळाळी; जाणून घ्या आज काय आहेत भाव

“शिवजयंतीला नियम, पोहरादेवीला हैदोस, हेच का समसमान वाटप; मुख्यमंत्री महोदय उत्तर द्या”

सांगलीत भाजपला धक्का, जयंत पाटलांनी महापालिकेवर उधळला राष्ट्रवादीचा गुलाल

राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहेत का?- प्रवीण दरेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या