Top News महाराष्ट्र मुंबई

दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई | कोरोनामुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याकडे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे.

12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे. तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत असणार आहे. 10 वीचा निकाल ऑगस्टच्या अखेरीस लागणार आहे, ही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून पालकांनी परीक्षा केव्हा होणार आहे?, याबाबत विचारणा केली होती. मात्र निश्चित अशी कोणतीही तारीख शिक्षण खात्याकडून दिली जात नव्हती.

दरम्यान, परीक्षा कशा होणार ऑनलाईन की ऑफलाईन?, परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र याआधी परीक्षा ऑनलाईन घेणं कठीण असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं होतं त्यामुळे परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागणार असल्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका पाहण्याचा विचार करताय?; थोडं थांबा BCCI देणार गुडन्यूज!

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार काॅंग्रेसचा मोर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘या’ अभिनेत्रीचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

आमच्याकडे आहेर स्वीकारला जाईल, क्यूआर कोड स्कॅन करुन गुगल-पे किंवा फोन-पे करा!

“एमपीएससी संदर्भात आम्ही मार्ग काढू”

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या