बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र

चंदीगड | लग्नपत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. जालंदरच्या एका शिक्षिकेनं चक्क तिच्या एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत लग्नाचं नाटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा दिवस त्या विद्यार्थ्याला घरात डांबून त्याकडून लग्नाचे सर्व विधी पुर्ण करून घेतले. एका पंडिताच्या सांगण्यावरून या शिक्षिकेने हे कृत्य केलं होतं.

शिक्षिकेनं विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना ट्युशनच अमिष दाखवलं. घरची परिस्थिती बिकट असल्याने पालकांनी त्याला शिक्षिकेच्या घरी सहा दिवस राहायला आणि ट्युशनला पाठवलं होतं. त्यानंतर शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती करून लग्नांच नाटक केलं, हळदीचा आणि मेंहदीचा कार्यक्रम देखील पार पाडला. त्यानंतर त्याच्या सोबत मधुचंद्राचं नाटक देखील केलं होतं.

सहा दिवसानंतर तिने विधवा होण्याचं नाटक देखील केलं आणि पतीच्या मृत्यूची शोकसभा देखील भरवली होती. या सहा दिवसात तिनं विद्यार्थ्याकडून घरची कामं करून घेतली. लग्नाचे सर्व रितीरिवाज पुर्ण केल्यानंतर तिनं मुलाला घरी पाठवलं. झालेला प्रकार विद्यार्थ्यानं घरी सांगितल्यानंतर पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.

शिक्षिका आणि सल्ला देणारा पंडित पोलीस स्टेशनला पोहचले आणि त्यांनी हे लग्न प्रतिकात्मक असल्याचं सांगितलं. पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी हा प्रकार केल्याच शिक्षिकेने सांगितलं आहे. पालकांनी शिक्षिकेविरूद्ध तक्रार केली पण नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. झालेला प्रकार डीएसपी गुरमित सिंग यांना समजताच त्यांनी पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

महिलासंदर्भात वागताना, बोलताना… सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश-वकिलांना महत्त्वाचा सल्ला

‘काहीजण वडलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागवत असेल तर हे…’; रोहित पवारांची मोदींवर टीका

‘या’ कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा घेतला निर्णय!

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More