नवी दिल्ली | राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वसामान्य जनतेचंही योगदान लाभावं यासाठी देशातील नागरिकांकडून निधी जमा करण्यात येणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलं होतं. मात्र वर्गणी फक्त हिंदू कुटुबांकडेच मागणार असल्याचं विहिंपकडून सांगण्यात आलं आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जाणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी सांगितंल आहे.
या मोहीमेत सर्वधर्मियांकडून निधी घेतला जाणार आहे?, असा सवाल विजय शंकर तिवारी यांना केला असता त्यावर ते म्हणाले, श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.
दरम्यान, इतर धर्मियांच्या घरी कार्यकर्ते फिरणार नाहीत परंतू मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर बांधवांनी जर स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांच्या निधीचा आम्ही सन्मानाने स्वीकार करणार असंही तिवारी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“हिंदू देशविरोधी असू शकत नाही मग गांधींची हत्या करणारा गोडसे कोण होता?”
“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि कायम राहतील”
सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल
आकडा टाकणाऱ्यांनो सावधान! वीज चोरीची माहिती देणाऱ्यास…- ऊर्जामंत्री नितीन राऊत
कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…