मुंबई | गेल्या एक-दोन महिन्यांपासून नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती संपली होती. नागरिकांनीही सरकारने सांगितलेल्या नियमांना केराची टोपली दाखवली. नागरिकांच्या याच हलगर्जीपणामुळे कोरोना सध्याला फोफावला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे.
केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असल्याचं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्याचसोबतच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास कोरोना पुन्हा येईल, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
कोरोनाने देशासह राज्यात पुन्हा डोक वर काढलं आहे. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही मोठ्या संख्येने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणार आहेत की नाही हे सांगितलं आहे.
दरम्यान, आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल ही सूचना कोरोना आपल्याला देत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचं की नाही हे तुम्हीच मला येत्या आठ दिवसात सांगा, म्हणजे मास्क लावणार असेल तर मी नाही समजतो आणि मास्क लावणार नसताल तर लॉकडाऊन करा असं मी समजतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पोलीस मारहाण प्रकरणात राज्यातील ‘या’ भाजप आमदाराला अटक
राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार
मारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका
…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय