Top News महाराष्ट्र मुंबई

‘राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच परंपरा’; कृषी विधेयकावरून शरद पवारांवर भाजपचं टीकास्त्र

मुंबई | कृषी विधेयक सरकारने तात्काळ रद्द करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

आत्मचरित्रात कृषीउत्पन्न बाजार समितीची एकाधिकारशाही मोडून काढण्याचा जोरदार पुरस्कार करणारे शरद पवार आज राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच्या परंपरेनुसार मोदी सरकारच्या एकाधिकारशाही मोडून शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कृषीविधेयकांना विरोध करत आहेत, असं भातखळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांचं आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’, याचा हवाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून भाजप नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह- रोहित पवार

मोठ्या मनाचा माणूस; सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात

…म्हणून मी कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही- मुकेश खन्ना

धनगर आरक्षणासाठी 16 ऑक्टोबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या