Top News महाराष्ट्र मुंबई

हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत- अतुल भातखळकर

मुंबई | धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अगोदरपासूनच सर्व सत्य परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे. हा माणूस जर खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवारांच्या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकरांनी निशाणा साधला आहे.

हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत, अशा तिखट शब्दात भातखळकरांनी टीका केली आहे. धनंजय मुडेंवर तरूणीने केलेल्या गंभीर आरोपांनंतर शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरूनही भातखळकरांनी त्यांच्यावर टीका केली.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भातखळकरांच्या या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘पंतप्रधान मोदी यांचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; राज्यातील काँग्रेसच्या या एकमेव खासदाराचं मोदींना चॅलेंज!

‘देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झाले आहेत’; थोरातांची नरेंद्र मोदींवर टीका

धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी सोडलं मौन; म्हणाल्या…

त्या माझा आदर करतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, पण आदर दुरूनच करा- कृष्णा हेगडे

लस घेतली म्हणजे आता सर्व काही संपलं असं नाही- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या