…तर मग सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका- चित्रा वाघ
मुंबई | राज्य सरकारने येत्या 14 तारखेची ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुढे ढकलली. यावरून सध्या राज्य सरकारवर टीका होताना दिसत आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे पत्रक जाहीर केलं होतं त्यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जे पत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलं ते मंत्रिमंडळातील आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात आलं होतं.
एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग सांगतं की हे पत्र मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आलं मात्र या विभागाचे मंत्रिमंडळातील मंत्री विजय वडेट्टीवारांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार तुमचा सचिव जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचं त्या खुर्चीवर कामचं काय?, सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका ही तकलादू कारण देऊन जनतेला येडं बनवू नका महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळताय हे लक्षात ठेवा ही तरूणाई तुम्हाला कधी माफ करणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं होतं.
वडेट्टीवार साहेब
तुमचा सचिव जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचं त्या खुर्चीवर कामचं काय??
सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका
ही तकलादू कारण देऊन जनतेला येडं बनवू नका महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळताय हे लक्षात ठेवा ही तरूणाई तुम्हाला कधी माफ करणार नाही#mpsc https://t.co/upUfsSg4JO— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 11, 2021
थोडक्यात बातम्या-
ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या- अमित ठाकरे
भरधाव रिक्षाच्या धडकेनं तरुणी कोमात, 9 दिवस झाले पोलिसांना रिक्षाचालक सापडेना!
‘मी वचन देतो….’; पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
व्हिडीओ शेअर करत प्रियंका चोप्राने दिली गुड न्यूज!
MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात वडेट्टीवारांच्या खात्याचा हात पण मंत्री म्हणतात, मला विचारलंच नाही!
विजय वडेट्टीवर यांच्या खात्यानं दिला MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला!
Comments are closed.