बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”

पुणे | इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याने पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आणि पुरोगामी राजकीय नेते इंदुरीकरांवर चांगलेच तुटून पडले आहेत. मात्र अशातच महाराज तुम्ही फक्त आवाज द्या आम्ही ताकदीनिशी तुमच्या समर्थनार्थ उतरू, असं भाजप आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

मातीतला पैलवान जसा मातीशीनाळ तुटू देत नाही तशी महाराजांची कीर्तनाशी असलेली नाळ कधी तुटू देऊ नये, असं म्हणत महेश लांडगे यांनी महाराजांना प्रत्यक्षपणे पाठिंबा जाहीर केला. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

कीर्तनातून समाजपरिवर्तनाचा वसा घेतलेले वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर महाराजांच्या सोबत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर उभे असल्याचंही लांडगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आज इंदुरीकरांचं मोशी येथे कीर्तन पार पडलं. त्याअगोदर त्यांच्या चाहत्यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढली. वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. लोक मोठ्या संख्येने इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायला आले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”

“अजित पवारांनी भाजपला व फडणवीस साहेबांना ‘मामु’ बनवलं”

महत्वाच्या बातम्या-

आगीचे लोळ उठले होते तरी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!

इंदुरीकरांची क्रेझ वाढली, चाहत्यांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक!

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे; शरद पवांरांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कानमंत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More