मुंबई | कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंवर केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यभर या प्रकरणाची चर्चा आहे. मात्र धनंजय मुंडेंनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावत तक्रार करणारी तरूणी रेणू शर्माची मोठी बहीण करूणा शर्मासोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे.
महत्वाचं म्हणजे या प्रकरणात भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांच्या गौप्यस्फोटानंतर मोठा ट्विस्ट आला आहे. अशातच रेणू शर्माचे वकील यांनी पत्रकार परिषद घेत अनेक दावे केला आहेत. त्यासोबतच रेणूने इतके दिवस का तक्रार दाखल केली नाही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
रेणू शर्मा यांच्यावर बलात्कार झाला असून त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून रेणू यांनी केस दाखल केली नसल्याचं रमेश त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रेणू यांच्यावरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेलं नाही. आम्हाला जेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू , असं त्रिपाठींनी रेणूवर इतर नेत्यांनी केलेल्या आरोपावर म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही”
“धनंजय मुंडे मंत्री म्हणून तुम्ही ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटे’ अशी भूमिका घेत आहात”
हमाम में सब नंगे है, तुमचा हिशोब काढला तर त्रास होईल- संजय राऊत
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रं हाती घ्यावीत”
…मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल- संजय राऊत
Comments are closed.