Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ नामवंत महाविद्यालयात गुणांची फेरफार; चौकशीत उघडकीस आला धक्कादायक प्रकार

पुणे |  पुण्यातील मॉडेल कॉलनीतील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्म्युल्यांकन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे

सिम्बॉयसिस कॉलेजमधील दुरुस्थ शिक्षण विभागात विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्मुल्यमापन करुन 187 विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिम्बॉयसिस संस्थेच्या डिस्टन्स लर्निंगचे रजिस्टार नामदेव आनंद कुंभार यांनी सायबर पालिसांकडे तक्रार दिली आहे. यावरुन पोलिसांनी संदिप हेंगळे आणि सुमित कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संदिप हेंगळे हे सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे मुल्यमापन विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांनी स्वत:च्या अर्थिक फायद्याकरता बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन सुमित कुमार या विद्यार्थाकडून पैसे घेतले आणि त्याचे गुण वाढवले, असा आरोप आहे.

दरम्यान, संदिप हेंगळे आणि सुमित कुमार यांनी ग्रेस मार्क पॉलिसीचे उल्लंघन करुण एकूण 187 विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढवल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुणे जिल्ह्यात एका दिवसात 4 हजाराहून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

‘…तेव्हा बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी का केली नाही’; रोहित पवारांचं पासवान यांना पत्र

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा- रामदास आठवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी 5 खासदारांना कोरोनाची लागण!

कोरोनावर लस आली की विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा घेईन- केंद्रीय आरोग्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या